News Flash

आदित्य ठाकरेंसाठी युवासेना म्हणतेय ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’

यापूर्वी शिवसेनेकडून ‘यंग सोच विन्स’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते.

फोटो - Nirmal Harindran

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून आता सत्तास्थापनेसाठी चढाओढ सुरू झाली आहे. अशातच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही आहे. तसंच आपल्याला दिलेली आश्वासनं लेखी स्वरूपात देण्याची मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी युवासेनेनंही एक जोरदार मोहीम सुरू केली आहे. ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ ही मोहीम युवासेनेकडून सुरू करण्यात आली आहे.

युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युवासेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे अभिनंदनाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसंच यावर ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ असं लिहिण्यात आलं आहे. अशा अनेक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारावी अशी मागणी अनेक शिवसैनिकांनी बॅनर्सच्या माध्यमातून केली होती. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरेश माने यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता.

यापूर्वीही शिवसेनेकडून अनेक ठिकाणी ‘यंग सोच विन्स’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘यंग सोच विन्स’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. शिवसेनेकडून भाजपाकडे ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलाची मागणी करण्यात आली आहे. तसंच राज्यातील मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी शिवसेनेकडे असावं, असंही सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्रिपद दुय्यम असून मुख्यमंत्रिपद हवं असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 9:04 am

Web Title: yuva sena new campaign my mla my cm for aditya thackeray maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल’; पुण्यात नाही तर बारामतीत पाट्या
2 “सरकार स्थापनेसाठी आम्हाला पर्याय निवडण्यास भाग पाडू नका”
3 राज्य विकणाऱ्या फडणवीस सरकारला जाब विचारणार -पटोले
Just Now!
X