क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एका युवकाने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना आज सकाळी आठ वाजता नागपूरमधील कळमन्यातील गोपालनगरात घडली. विक्रांत बंडगर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून गेल्या चोवीस तासांतील उपराजधानीतील हे दुसरे हत्याकांड आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत बंडगर हा मूळचा हैदराबादचा असून त्याला विवाहित बहिण आहे. आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो कामाच्या शोधात नागपुरात आला. तो मिळेल ते काम करीत होता. पदपाथ किंवा मिळेल तेथे राहत होता. त्याची गणेश भेंडेकर (२६, आदिवाशी प्रकाशनगर, चिखली लेआऊट) याच्याशी मैत्री होती. दोघेही सोबत राहत होते. सोमवारी दोघेही डिप्टी सिग्नल परिसरात सोबतच फिरत होते. दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला. गणेशने दगडाने विक्रांतवर हल्ला केला. तो खाली कोसळताच चाकूने भोसकले. त्यामुळे विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
two injured including a woman in fire incidents fire broke out at three places in pune city
मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग

पोलीस उपायुक्त मनिष कलवानीया आणि ठाणेदार विनोद पाटील यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी गणेश भेंडेकरला अटक केली.