संगमनेरजवळ अपघात पुलावरून मोटार कोसळून १ ठार

पुणे-नाशिक मार्गावरील चंदनापुरी शिवारात तवेरा कार पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

पुणे-नाशिक मार्गावरील चंदनापुरी शिवारात तवेरा कार पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. सर्व प्रवासी खासगी कामानिमित्त पुण्याला जात असताना आज सकाळी ही दुर्घटना घडली.
दिनकर मधुकर पाटील असे मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून विलास मधुकर पाटील, शाळिग्राम मधुकर पाटील, गौरव दिनकर पाटील आणि मनोज छगन आहेर (सर्व राहणार नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. वरील सर्व जण तवेरा कारमधून (क्र. एम. एच. १५ बीसी २५१६) पुण्याला जाण्यास निघाले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची गाडी जावळेवस्तीनजीक असलेला एक छोटा पूल ओलांडत होती. परंतु काही कळायच्या आत अचानक गाडी पुलावरून खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याच पुलाशेजारी चौपदरीकरणांतर्गत नवीन पुलाच्या पायाचे काम चालू असून त्यातून वर आलेले लोखंडी गज कारमधे घुसल्याने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील सर्व जण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहे. अपघातात कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून पोलिसांनी कारचालक मनोज आहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1 killed in car crash near sangamner