अलिबाग- रायगड जिल्ह्यातील ३२ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकून पडले होते. यातील १० विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. तर  आणखी ८ विद्यार्थी हे रोमानियात तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी उद्या भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

Russia Ukraine War Live : ‘आम्ही रशियाच्या पाठिशी…’, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांच्यासोबत फोनवर साधला संवाद

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

  आर्यन पाटील, अभिजीत थोरात, पुर्वा पाटील, यश काळबेरे, प्रेरणा दिघे, अद्वैत गाडे, सालवा सलीम महम्मद धनसे, प्रचिती पवार, मोहम्मद करीम शेख, अनुजा जायले हे दहा विद्यार्थी सुखरूप भारतात परतले आहेत. उर्वरीत २२ विद्यार्थ्यांपैकी ८ जण रोमानियात तर ७ जण हंगेरीतील बुडापिस्ट येथे पोहोचले आहेत. २ जण स्लोवाकीया, १ जण रशियन सिमेवर पोहोचला आहे. त्यामुळे हे सर्वजण येत्या दोन दिवसात सुखरूप परतणे अपेक्षित आहे.

आधीपासून शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर..; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

युक्रेन मध्ये अडकूल पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अलिबाग येथे आपत्ती व्यवस्थापन कक्षात मदत कक्ष कार्यान्वयीत करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी दररोज संपर्क साधला जात आहे.