Download 10th Board Exam Time Table : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) इयत्ता १० वी परीक्षेच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या आहेत. दहावी बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे वेळापत्रक आणि हॉल तिकीट…

विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून थेट परीक्षेच्या तारखा मिळवू शकता आणि फोनमध्ये वेळापत्रक ऑनलाईन डाउनलोड करून ठेवू शकता. या वेळापत्रकात दहावीच्या परीक्षांच्या तारखा, वेळा आणि विषयांची रूपरेषा दिली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक प्रभावीपणे नियोजन करता येईल.

MSBSHSE SSC Time Table 2026 : अधिकृत वेबसाइटवरून वेळापत्रक कसे डाउनलोड करायचे?

वेळापत्रकाचे पीडीएफ सेव्ह करा आणि त्याची झेरॉक्स काढून ठेवा. त्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील…

अधिकृत वेबसाइटला भेट द्या

तुमचा वेब ब्राउझर mahahsscboard.in वर नेव्हिगेट करा, जी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट आहे.

वेळापत्रकाची लिंक शोधा

होमपेजवर, “महाराष्ट्र एसएससी आणि एचएससी परीक्षेचे वेळापत्रक पीडीएफ” किंवा “Latest Notification” असा मजकूर लिहिलेल्या टेबलमध्ये तुम्हाला वेळापत्रकाचा पर्याय दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.

डाउनलोड करा आणि प्रिंट काढा

एकदा तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर, वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात तुमच्या समोर दिसेल. त्यानंतर तुम्ही ही पीडीएफ तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आऊट काढून स्वतःजवळ ठेवू शकता…

अधिकृत वेबसाईट

https://www.mahahsscboard.in/en

वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठीची लिंक…

SSC_M26_faa87aacf7.pdf

परीक्षेला जाताना आणि परीक्षा देताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी…

  • हॉल तिकीट – तुमचे हॉल तिकीट दररोज बरोबर घेऊन जा; त्याशिवाय प्रवेश नाकारला जाईल.
  • वेळेआधी पोहचणे – वेळापत्रकानुसार ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहचा.
  • मर्यादा ठेवा – उत्तरे संक्षिप्तपणे लिहा आणि दिलेल्या शब्दमर्यादेचे पालन करा.
  • शेवटच्या काही मिनिटांत, कोणत्याही चुकांसाठी (क्रमांक, स्पेलिंग, अपूर्ण उत्तरे) तुमची उत्तरपत्रिका पूर्णपणे तपासून घ्या…
  • कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे (फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर) किंवा अनुचित साधनसामग्री आणण्यास परवानगी नाही.