बार्शीत ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मनोविकृत तरुणाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सोलापूर : दुधाची पिशवी आणून दे, पैसे देतो, असे आमिष दाखवून एका अकरा वर्षांच्या मुलाला स्वत:च्या घरात बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मनोविकृत तरुणाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्शी शहरात हा संतापजनक घडला.

अकबर ऊर्फ टिपू अमीर शेख (वय २१) असे या गुन्ह्य़ातील आरोपीचे नाव आहे. अकबर याने सायंकाळी पीडित मुलाला हाक मारून बोलावून घेतले. दुकानातून दुधाची पिशवी आणून दे, मी तुला पैसे देतो, असे आमिष दाखवून त्याने पीडित मुलाला घरात नेले. त्यावेळी घरात अन्य कोणीही नव्हते. तेव्हा अकबर याने पीडित मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

नंतर या घटनेची वाच्यता केल्यास मारण्याची धमकीही त्याने दिली. त्यामुळे घाबरून पीडित मुलाने घरात आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाची वाच्यता केली नाही.

मात्र घरात जेवण करताना खाली व्यवस्थित बसता येत नसल्यामुळे आईने त्याला विचारणा केली असता हा प्रकार उजेडात आला. पीडित मुलाच्या वडिलांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 11 year old boy sexually assaulted in barshi zws

ताज्या बातम्या