11th Admissions Maharashtra: प्रवेशासाठी लागणाऱ्या ‘या’ महत्वाच्या प्रमाणपत्राशिवाय आता मिळणार प्रवेश

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी काल १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

11th admissions Maharashtra
११ वी प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे

राज्यात १० वीचा निकाल लागल्यापासून सर्वत्र ११वीच्या प्रवेश प्रक्रीयेबद्दल चर्चा सुरु आहे. प्रवेश प्रक्रिया म्हंटल की प्रवेशासाठी कागदपत्रे,आवश्यक प्रमाणपत्र जमा करावी लागतातच. अनेकदा या गोष्टीमुळे मुलांना प्रवेशापासून मुकावं लागत. हे यंदाच्या वर्षी होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून पोस्ट करत घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात.

प्रवेशाच्या वेळी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र (Caste Certificate) नाही अशा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी सरकारकडून ३० दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एकदा विद्यार्थ्यांच्या नावाचं जात प्रमाणपत्र आलं की विद्यार्थ्यांना ते कॉलेजमध्ये सबमिट करावं लागणार आहे.

वर्षा गायकवाड यांचे ट्विट

३१ ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले की, “स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इ.११ वी प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे.#11th_admission”

या निर्णयामुळे ११वीत प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना  निश्चितच दिलासा मिळाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 11th admission process school education department maharashtra to allow father caste certificate as important document ttg