MSBSHSE Class 12th Results 2026 Date Time Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) बारावीचा (HSC) निकाल आज शनिवारी, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. ही माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी गुरुवारी दिली. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. यंदाचा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन दिवस आधी जाहीर होत आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ५ मे रोजी लागला होता.
तसेच तुम्ही हा निकाल पाहण्यासाठी पुढील अधिकृत वेबसाइट्सचा वापर करू शकता…
१. hscresult.mkcl.org
२. mahahsscboard.in
निकाल तपासण्याच्या स्टेप्स
- mahahsscboard.in किंवा hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होम पेजवरील “HSC Result 2026” या लिंकवर (Link) क्लिक करा.
- तुमचा सीट क्रमांक (Roll Number) आणि आईचे पहिले नाव टाईप करा.
- ‘Submit’ वर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- गुणपत्रिका (Marksheet) डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून घ्या.
यंदा महाराष्ट्रात बारावी (HSC) परीक्षेसाठी एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ७ लाख ९९ हजार ७७३ विद्यार्थी विज्ञान शाखेचे, ३ लाख ८० हजार ६९२ विद्यार्थी कला शाखेचे, तर ३ लाख २० हजार १५२ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते. तसेच २७ हजार ३७८ विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आणि ४ हजार ४९२ विद्यार्थी आयटीआय (ITI) शाखेचे होते.
ही परीक्षा महाराष्ट्र राज्य मंडळाच्या एकूण ९ विभागांमध्ये आयोजित करण्यात आली होती. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कोकण. ‘कॉपीमुक्त परीक्षा’ मोहिमेअंतर्गत, कडक पाळत ठेवण्याच्या उद्देशाने, राज्यभरातील ३००० हून अधिक परीक्षा केंद्रांमधील प्रत्येक वर्गात प्रथमच सीसीटीव्ही (CCTV) पाळत यंत्रणा बसवण्यात आली होती.
