सातारा - महाबळेश्वर येथे १६०.६० मिमी, तर जिल्ह्यात आज सरासरी २१.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ७५७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांमध्ये एकूण १२७.९७ अब्ज घन फूट (टीएमसी) पाणीसाठा असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी दिली. हेही वाचा >>> CM Eknath Shinde : “लाडक्या बहिणी कपटी आणि सावत्र भावाला धडा शिकवतील”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे नद्या, ओढे, नाले भरभरून वाहत आहेत. विहिरींच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. सातारा शहरात व तालुक्यात, कास पठारावर जोरदार पाऊस सुरू आहे. साताऱ्यातील ऐतिहासिक तळी काठोकाठ भरली आहेत. सततच्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धोम धरणातून ७६२१ क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे.कालव्याद्वारे २०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. वाई शहरात गणपती घाटावर पाणी आल्याने महागणपती पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. यामुळे किसन वीर चौकात अनेकदा वाहतूककोंडी होत आहे. हेही वाचा >>> जयकुमार गोरे यांच्याविरोधातील याचिकाकर्त्यांच्या घरावर छापा महाबळेश्वर येथे १४०.६० मिमी एकूण ४३३१.७० मिमी (१७०.५३९ इंच) पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १२७.९७ टीएमसी पाणीसाठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून, सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे. मोठे प्रकल्प - कोयना ८६.७२ (८२.३९), धोम ११.५२ (८५.१६), धोम - बलकवडी ३.४४ (८४.३१), कण्हेर ८.०१ (७९.३१), उरमोडी ८.१२ (८१.५३), तारळी ५.०४ (८६.१५) या प्रमाणे पाणीसाठा आहे.