आयकर विभागाने मुंबईच्या दोन रिअल इस्टेट व्यवसाय समूहांवर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या घरी नुकतीच छापेमारी केली होती. या छापेमारीतून सुमारे १८४  कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे, अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला दिली. ७ ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका निवेदनात म्हटलंय.

“छापेमारी दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यामुळे प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. दोन्ही व्यवसाय समुहांपासून सुमारे १८४ कोटीच्या बेहिशेबी उत्पन्नाचा पुरावा देणारी धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत,” असे सीबीडीटीने म्हटले आहे. मात्र, त्यांनी संबंधित संस्थांचे नाव निवेदनात उघड केलेले नाही. तसेच या छापेमारी दरम्यान २.१३ कोटींची बेहिशेबी रोकड आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच या कंपन्यांचे काही आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचंही म्हटलंय.

bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

“आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर प्रथमदर्शनी अस दिसतंय की बोगस शेअर प्रिमिअम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, काही विशिष्ट सेवांसाठी असमाधानकारक अॅडव्हान्स आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यासोबत सौदे करून हे पैसे मिळवण्यात आले आहे आणि महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाचा त्यात सहभाग आहे. संशयास्पद पद्धतीने मिळवलेल्या या पैशांचा उपयोग विविध मालमत्तांच्या खरेदीसाठी केला गेला आहे. या पैशांचा वापर करून मुंबईतील एका मुख्य ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील पॉश परिसरात फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतजमीन घेण्यात आली, तसेच साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तेची किंमत १७० कोटी रुपयापर्यंत आहे,” असंही सीबीडीटीने निवेदनात म्हटलंय.