लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यासाठी चिंताजनक बातमी आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात करोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात करोनाचे ४०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात २६६ जण करोना मुक्त झाले आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या नऊ हजारांवर पोहोचली आहे.

सध्या ३ हजार ५३९ करोनाचे रुग्ण आहेत. तर ५ हजार ४७२ रुग्ण करोना मुक्त झाले आहे. तर २४९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या ९ हजार २६० वर पोहोचली आहे. २९६ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ४०२ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १३४, पनवेल ग्रामिण मधील ६३, उरण मधील १७, खालापूर २९, कर्जत २६, पेण ३२, अलिबाग ५०, मुरुड ४, रोहा १६, सुधागड १, श्रीवर्धन १३, म्हसळा ८, महाड ९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ७, उरण २, खालापूर २, पेण १, अलिबाग ३, मुरुड १, म्हसळा १, महाड १, पोलादपूर १ अशा तब्बल १९ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २६६ जण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३१ हजार ३३२ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५३९ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४७२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४९६, उरण मधील १५१,  खालापूर २९४, कर्जत १४४, पेण ३८०, अलिबाग २६५,  मुरुड ४९, माणगाव ६५, तळा येथील २, रोहा ८५, सुधागड १, श्रीवर्धन ३८, म्हसळा ४८, महाड ४१, पोलादपूर मधील ८ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५९ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.