लातूरकरांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षांत घनकचरा उचलण्यापोटी तब्बल २ कोटी ३२ लाख, तर शौचालयापोटी १९ लाख ६० हजारांचा स्वच्छता कर मनपाकडे भरणा केला.
नऊ करांच्या रूपाने ९ कोटी ७३ लाख ७१ हजार ४२० रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. अजूनही लातूरकरांकडून ९ कोटी करांचा भरणा होणे बाकी आहे. अग्निशमन, मालमत्ता कर, वृक्ष कर, मनपा शिक्षण, राज्य शिक्षण, रोहयो, स्वच्छता आकार व पथदिवे यासाठी मनपास कर द्यावा लागतो. या आर्थिक वर्षांच्या शेवटी १८ कोटी ४६ लाख ५३ हजार ९८२ रुपये थकीत व चालू बाकी होती. पकी ९ कोटी ७३ लाख ७१ हजार ४२० रुपये वसूल झाले. अजून ८ कोटी ७२ लाख ८२ हजार २६२ रुपये येणे बाकी आहे.
मालमत्ता करापोटी ८ कोटी ६० लाख ४४ हजार ४५० रुपये येणे बाकी होते. पकी ४ कोटी ९७ लाख ३५ हजार ९४० रुपये वसूल झाले. वृक्ष करापोटी ३५ लाख २१ हजार ७८८ रुपये येणे बाकी होते. पकी १७ लाख ५१ हजार ८१ रुपये वसूल झाले. शिक्षण कर २ कोटी ६ लाख ९४ हजार ४२५ रुपये येणे बाकी होते, पकी १ कोटी ४ लाख ९६ हजार ४६ रुपये वसूल झाले. घनकचरा कर ५ कोटी २२ लाख ७३ हजार ८५२ रुपये येणे बाकी होते. पकी २ कोटी ३२ लाख ७७ हजार ९० रुपये वसूल झाले. पथ कर ४७ लाख ७४ हजार ७१८ रुपये येणे बाकी होते, पकी २८ लाख ६६ हजार ७७३ रुपये वसूल झाले आहेत.