लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : परळीमध्ये शेतकर्‍याकडून २८ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या मिरजेतील घराच्या झाडाझडतीमध्ये लाच लुचपत विभागाने २ किलो सोन्यासह १ कोटी ६२ लाखाची संपत्ती जप्त करण्यात आली. बीड लाच लुचपत विभागाने बँक लॉकर सिल करून जप्त केलेला ऐवज परळी पोलीसांकडे जमा केली आहे.

bjp, illegal building
डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत तोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा अडथळा, उच्च न्यायालयाच्या इमारत तोडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष
fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
Accused trying to sell crocodile in Powai arrested mumbai
पवईत मगरीच्या पिल्लाच्या विक्रीचा प्रयत्न; आरोपी अटकेत
Senior Police Inspector in ACB net Accused of demanding bribe by getting money back from the complainant Mumbai
वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; तक्रारदाराला पैसे परत मिळवून लाचेची मागणी केल्याचा आरोप
mumbai businessmen, cheated for rupees 1 crore
मुंबई: स्वस्त सोन्याची बिस्किटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
Gokul medicine purchase scam letter stirs up Denial by the team
‘गोकुळ’च्या औषध खरेदी घोटाळ्याच्या पत्राने खळबळ ; संघाकडून इन्कार
Yavatmal, accident, car hit truck,
यवतमाळ : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार जण ठार, एक गंभीर
Gadchiroli, demand for Investigation Missing Land Transaction Documents, Archana Parlewar, Archana Parlewar Alleged Scam Land Transaction Documents, Gadchiroli news
गडचिरोली : नगररचना विभागातील दस्ताऐवज धोक्यात? अर्चना पार्लेवार यांच्या कार्यकाळातील कागदपत्रे ताब्यात…

याबाबत मिळालेली माहिती अशी, चिंचोटी तलावातील गाळ माती काढून नेण्यासाठी आवश्यक परवाना देण्यासाठी पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांने ३५ हजाराची लाच मागितली होती. चर्चेअंती २८ हजार रूपये लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या बीडमधील पथकाने त्याला रंगेहात अटक केली.

आणखी वाचा-“व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव, सहज शृंगार चेष्टेने..”, मनुस्मृतीतली २४ तत्त्वं सांगणारी जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

अटकेनंतर अपसंपदा बाबत माहिती घेत असताना सलगरकर हा मूळचा मिरजेतील असल्याची माहिती मिळाल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पथकाने कुपवाड रोडवरील त्याच्या निवासस्थानी चौकशी केली असता त्याचे युनियन बँकेमध्ये लॉकर असल्याची माहिती मिळाली. या लॉकरची झडती घेतली असता त्यामध्ये ११ लाख ८९ हजाराची रोकड, २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने, ज्यामध्ये १ किलो ११४ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि ९९१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १ कोटी ६१ लाख ८९ हजाराचा ऐवज मिळाला. सांगलीच्या पथकाने परळी पोलीस ठाण्याकडे जप्त केलेला ऐवज वर्ग केला असल्याचे लाच लुचपत विभागाकडून सांगण्यात आले.