वाहनाखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

मालमोटारी खाली चिरडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू होण्याची घटना आज (शनिवारी) नाशिक येथे घडली.

मालमोटारी खाली चिरडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू होण्याची घटना आज (शनिवारी) नाशिक येथे घडली. नाशिकमधील त्रिमुर्ती चौकात सकाळी साडे आठच्या दरम्यान सदर अपघाताची घटना घडल्याचे वृत्त आहे.
संकेत परदेशी आणि मुजफ्फर खान ही मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही दहावीचे विद्यार्थी होते. संकेत आणि मुजफ्फर निरोप समारंभासाठी शाळेत जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मालमोटारीने त्यांना उडवले. त्यांनर दोघांनाही त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे दोघेही नवजीवन डे स्कूलचे विद्यार्थी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2 school childrens dead in accident