जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

ही दोन्ही मुले अभियांञीकीचे विद्यार्थी होती.

धोम जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू  झाला आहे. आज सकाळी हे तरूण पुण्यातून वाईला आले होते.
कौस्तुभ विजय मढेंकर रा. वाई व अमेय शशांक बांग रा. वसंतविहार ,जैन मंदिर रोड ,शिळफाटा ,खोपोली असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. ही दोन्ही मुले अभियांञीकीचे विद्यार्थी होते. हे दोघेही धोम जलाशयात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या दोघांसोबत असलेल्या एका मित्राला पोहता येत नव्हते म्हणून तो पाण्यात उतरला नव्हता.  त्यानेच याबाबत जलाशयालगतच्या लोकांना सांगितले.  याबाबत अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2 youngsters drown in dhom