सांगली : अंकली (ता.जत) येथे एका घरगुती कार्यक्रमावेळी आयोजित करण्यात आलेल्या पुरणपोळी-आमरसचे जेवण घेतल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. रात्री उलटी व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने २० रुग्णांना कवठे महांकाळ व मिरज येथील रुग्णालयात दाखल खरण्यात आले आहे.

जत तालुक्यातील अंकले गावात सुहासिनी महिलासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरणपोळी-आमरसचे जेवण होते.  जेवण झाल्यानंतर जवळपास २० जणांना मळमळ, उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. जेवणातील आमरसातुन विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.विषबाधा झालेल्या मध्ये महिलांची संख्या अधिक, तर काही पुरुष आणि काही लहान बालकाचा समावेश आहे.विषबाधा झालेल्यांना कवठेमहांकाळ, मिरज मधील  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tourist drowned in Alibaug sea
अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Read Special Article on Dombivli blast and fire Incidents
डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
raosaheb danve on loksabha result
“शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळे आमच्या पंगतीत जेवून गेले, त्यांना वाढायला मीच होतो”; रावसाहेब दानवेंचं विधान चर्चेत!
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!

हेही वाचा >>>सातारा: आचारसंहिता संपताच जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची गर्दी; प्रशासनाच्या बारनिशी मध्ये निवेदनांचा खच

रुग्णांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गुरुवारी दुपारी यातील चौघांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालय मिरज येथे दाखल करण्यात आले आहे. पुरणपोळीच्या जेवणातून विषबाधा झालेल्या रुग्णामध्ये विक्रम तुकाराम ऐवळे (वय ३१), लता तुकाराम ऐवळे (वय ४१), संपता कुंडलिक ऐवळे (वय ५५), प्रमिला तुकाराम ऐवळे (वय ३५), प्रसाद तुकाराम ऐवळे (वय ११), चैतन्य सोपान ऐवळे (वय २७), निवृत्ती पांडुरंग ऐवळे (वय ३५), पारुबाई पांडुरंग ऐवळे (वय ७०), साक्षी दादासाहेब ऐवळे (वय १६), समर्थ अनिल गेजगे (वय ६), सुरेखा अनिल गेजगे (वय २२), नंदाबाई वसंत गेजगे (वय ५५), सिताराम बाळू ऐवळे (वय ७०), राजाबाई आप्पा ऐवळे (वय ७५), अथर्व दादासाहेब ऐवळे (वय १८) आदींचा समावेश आहे.