scorecardresearch

राज्यातील मंत्री, आमदारांच्या पाठोपाठ आता मंत्र्यांची कार्यालये देखील करोनाच्या तावडीत

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील २१ आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ जण करोना पॉझिटिव्ह

राज्यातील मंत्री, आमदारांच्या पाठोपाठ आता मंत्र्यांची कार्यालये देखील करोनाच्या तावडीत
(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात सध्या करोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ सुरू झाली असून, राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. तर, करोनाच्या कचाट्यात सर्वसामान्य माणसापासून ते शासकीय अधिकारी, बॉलीवूडचे कलाकार व व्हीव्हीआयपी व्यक्ती देखील सापडताना दिसत आहेत. नुकतच राज्यातील अनेक आमदार करोना पॉझिटिव्ह आढळल्याचे, समोर आल्यानंतर आता राज्य सरकारच्या मंत्र्यांची कार्यालये देखील आता करोनाच्या तावडीत सापडली आहेत.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यलयामधील २१ कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. तर, आणखी १५ जणांचे रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे. तर, मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ जणांना करोनाचा संसर्ग झाले समोर आले आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या कार्यालयातीलही काही अधिकारी व कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत.

ज्यातील मंत्री, खासदार-आमदारांनाही संसर्ग झाला आहे. सध्या सहा मंत्री करोनाबाधित आहेत.  अधिवेशन संपल्यावर लोकप्रतिनिधींमधील करोनाचे प्रमाण वाढले आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये  प्रमाण वाढले आहे. यामुळेच मंत्रालयातही निर्बध वाढविण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 21 corona positive in home minister dilip walse patils office msr