नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २२६ इच्छुकांचे ऑनलाईन अर्ज

राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्याने धाकधूक वाढली

नाशिक महापालिका (संग्रहित)
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत २२६ इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला आहे. गेल्या २ दिवसात ११३ इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला होता. तर आज एकाच दिवसात ११३ जणांनी अर्ज भरला आहे. मात्र आज कोणीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष अर्ज जमा केला नाही.

काल (दि.२९) तीन जणांनी निवडणूक अधिका-यांकडे प्रत्यक्ष अर्ज दाखल केले. आतापर्यंत ऑनलाईन अर्ज भरणा-यांची संख्या आता २२६ वर पोहचली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊनही विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली नसल्याने इच्छुकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (दि.२७) महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांना ३ फेब्रुवारीपर्यंत आपला अर्ज दाखल करता येणार आहे. हा अर्ज इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. हा अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 226 hopeful candidates files nomination for nashik municipal corporation