scorecardresearch

“माझ्याकडे २७ फोटो अन् ५ व्हिडीओ, समोर आणले तर…”, संजय राऊतांचा भाजपाला थेट इशारा

“तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल, आमच्याकडे…”, असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

sanjay raut chadrashekhar bawankule (1)
संजय राऊत म्हणाले, "मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती काय आहे? आम्ही एखादी गोष्ट समोर आणल्यानंतर ट्रोलधाडीनं काहीतरी सांगायचं. मात्र, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. मग, फोटोत चिनी कुटुंब आहे का? जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल."

तेलगीने रात्रीत एका बारमध्ये १ कोटी रूपये उधळल्याची माहिती होती. पण, मकाऊमध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती कॅसिनोत साडेतीन कोटी डॉलर उधळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं अच्छे दिल आलेत, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी ‘एक्स’ अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचे कॅसिनोतील फोटो ट्वीट केले होते. यानंतर मी कुटुंबाबरोबर असल्याचं बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. अशातच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.

Supriya Sule criticizes BJP
सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”
sharad pawar chandrashekhar bawankule
“चंद्रशेखर बावनकुळेंचं ते वक्तव्य म्हणजे…”, शरद पवारांची सूचक टिप्पणी; म्हणाले, “जे अशी भूमिका घेतात…!”
eknath khadse ajit pawar girish mahajan
“अजित पवारांमध्ये डावललं जात असल्याची भावना”, खडसेंच्या विधानाला महाजन प्रत्युत्तर देत म्हणाले…
Aditya thackeray
“आजोबांची पूर्ण हयात…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर भाजपा नेत्याकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

हेही वाचा : संजय राऊतांकडून कॅसिनोतील ‘तो’ फोटो ट्वीट, बावनकुळे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी मकाऊ येथे…”

“कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे, मग…”

संजय राऊत म्हणाले, “मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती काय आहे? आम्ही एखादी गोष्ट समोर आणल्यानंतर ट्रोलधाडीनं काहीतरी सांगायचं. मात्र, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. मग, फोटोत चिनी कुटुंब आहे का? जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल.”

“मी भाजपाचं दुकान बंद करणार नाही, कारण..”

“माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. मात्र, आमच्यात माणुसकी आहे. २७ फोटो आणि व्हिडीओ समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल. पण, मी ते करणार नाही. कारण, हे दुकान २०२४ पर्यंत चाललं पाहिजे,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्र पेटलाय अन् हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत…”, बावनकुळेंचा ‘तो’ फोटो ट्वीट करत राऊतांचा हल्लाबोल

“आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय”

“मी कधी कुणावरही व्यक्तीगत टिप्पणी करत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल. आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 25 photos and 7 video chadrashekhar bawankule macau casio said sanjay raut warn bjp ssa

First published on: 20-11-2023 at 17:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×