अंगाची लाही लाही होणाऱ्या प्रचंड उकाड्यामुळे रात्री घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या कुटुंबीयांचे घर फोडून चोरट्यांनी २७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण १३ लाख रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोलापूरमधील माढा तालुक्यातील चिंचगाव येथे घडली आहे.

यासंदर्भात घरमालक प्रवीण भानुदास साठे यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द फिर्याद नोंदविली आहे. सध्या उन्हाळ्यात प्रचंड उकाडा जाणवत असून रात्रीही उष्णतेच्या झळा असह्य होतात. त्यामुळे घराला गच्ची किंवा समोर मोकळे अंगण असलेले कुटुंबीय रात्री घरात झोपण्याऐवजी गच्चीवर वा मोकळ्या अंगणात झोपणे पसंत करतात.

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…
South Mumbai
आमचा प्रश्न – दक्षिण मुंबई : जर्जर इमारती, चिंचोळ्या गल्ल्या अन् अरूंद रस्ते

कुर्डूवाडीनजीकच्या चिंचगावात प्रवीण साठे यांचे कुटुंबीय रात्री घराला बाहेरून कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. साठे यांनी पहाटे लवकर कामानिमित्त घराबाहेर पडायचे असल्यामुळे पहाटे पावणेतीन वाजता त्यांना जाग आली. ते गच्चीवरून खाली असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लगेचच कुटुंबीयांना झोपेतून उठविले आणि घरात जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट चोरट्यांनी फोडून त्यातील २७ तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रूपयांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याचे आढळून आले.

प्रवीण साठे यांच्या आजी वेणूबाई उबाळे मयत झाल्याने त्यांच्या सोन्याच्या पाटल्या, सोनसाखळी, अंगठ्या आदी दागिने मामा अनंता उबाळे यांनी साठे यांच्याकडे आणून ठेवले होते. हे दागिनेही चोरट्यांनी लांबविले.