Premium

“विधानसभेच्या २८८ जागा लढवणार,” अभिजीत बिचुकले यांची घोषणा; म्हणाले, “पहिल्या महिला मुख्यमंत्री…”

“राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे,” अशी मागणीही बिचुकलेंनी केली आहे.

abhijeet bichukale
"विधानसभेच्या २८८ जागा लढवणार," अभिजीत बिचुकले यांची घोषणा

बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. बिचुकले यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदासंघातून आणि पंढरपूर, कसब्यामध्ये पोटनिवडणूक लढवली होती. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त अभिजीत बिचुकले यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा लढणार असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, “राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बालवाडी ते दहावीपर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे,” अशी मागणी बिचुकले यांनी सरकारकडे केली आहे.

“राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरता. मग, शिवाजी महाराजांचे किती गुण तुमच्यात आहेत. हा प्रश्न सर्व नेत्यांना आहे. गरज पडली की शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं,” असेही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अलंकृता बिचुकलेंच्या नेतृत्वाखाली २८८ जागा लढण्याचा संकल्प शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त करत आहे. होतकरू आणि राज्याचा कळवळा असलेल्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आमदारकीची तयारी करावी,” असे आवाहनही बिचुकले यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 288 assembly seats will be contested announce big boss fame abhijit bichukale ssa