एसटी थांब्यावर मालट्रक घुसल्याने तिघांचा बळी

टेंभुर्णी-पंढरपूर रस्त्यावर परिते एसटी बसस्थानकावर थांबलेल्या सहाआसनी रिक्षा व दुचाकी वाहनाला भरधाव वेगातील मालमोटारीने ठोकरल्याने घडलेल्या अपघातात तिघा जणांचा बळी गेला.

गुडगावमधील आयएफएफसीओ चौक येथे एका ट्कचा भीषण अपघात झाला. चालक आणि त्याचा सहाय्यक गंभीररीत्या जखमी.(छाया -पीटीआय)

टेंभुर्णी-पंढरपूर रस्त्यावर परिते एसटी बसस्थानकावर थांबलेल्या सहाआसनी रिक्षा व दुचाकी वाहनाला भरधाव वेगातील मालमोटारीने ठोकरल्याने घडलेल्या अपघातात तिघा जणांचा बळी गेला.
धनंजय तुकाराम लामकाने (४०, रा. परिते, ता. माढा), त्याचा मुलगा समर्थ (५) व संतोष दत्तात्रेय बारसकर (३०, रा. आहेरगाव, ता. माढा) अशी तिघा मृतांची नावे आहेत. मृत संतोष बारसकर हा सहाआसनी रिक्षा घेऊन परिते एसटी थांब्यावर थांबला होता. त्याच वेळी शेजारी मोटारसायकलवर धनंजय लामकाने हे आपल्या मुलासह थांबले होते. परंतु पंढरपूरहून टेंभुर्णीकडे वळण घेत जाणारी मालमोटार अचानकपणे बसस्थानकात घुसली. यात सहाआसनी रिक्षा व मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने त्यात तिघांचा बळी गेला. एसटी थांबा उडवल्यानंतर मालमोटारही पालथी झाली. मालमोटारचालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3 killed due to motor accident

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या