बिबटय़ाची शिकार करून कातडीची तस्करी करताना पकडलेल्या आरोपींना मुख्य न्याय दंडाधिकारी अलिबाग यांनी तीन वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी संकेत घरत, यशवंत चिंचघरकर या दोन आरोपींना ही शिक्षा सुनावली असून आरोपी सागर पालवणकर याची या गुन्हय़ातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम २४८ (२) तसेच वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ चे कलम ४८ (ए) व ५१ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्याने ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही आरोपींस प्रत्येकी रक्कम २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर रक्कम न भरल्यास आरोपींस १ महिना अधिकचा कारावास भोगावा लागणार आहे. जप्त करण्यात आलेली बिबटय़ाची कातडी, ७ नखे ही विभागीय वन अधिकारी, अलिबाग यांच्या ताब्यात देण्याचे आदेश झाले असून दाव्यातील अपिल कालावधी समाप्त होईपर्यंत मुद्देमाल जतन करण्याचा आहे. बिबटय़ाच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेले अग्निशस्त्र (सिंगल बोअर गन) जप्त करण्यात आली असून त्याचा परवाना रद्द करण्याबाबत आदेशित करण्यात आले .

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी