scorecardresearch

सांगली : पोषण आहारातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा

वानलेसवाडी हायस्कूलमधील मुलांना भात व आमटी दिली असता मुलांना पोट दुखी, मळमळ आणि उलटी होऊ लागल्याने शालेय प्रशासनाची तारांबळ

सांगली : पोषण आहारातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा
सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा (संग्रहित छायाचित्र)

सांगली-मिरज रस्त्यावर भारती हॉस्पिटलसमोर वानलेसवाडी हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. यापैकी २३ विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

हेही वाचा- अबब.. आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन, थकित रक्कम मिळावी आणि इतर मागण्या

सांगली महापालिका क्षेत्रातील शाळांना मध्यवर्ती स्वयंपाक घरातून शालेय पोषण आहाराअंतर्गत भात देण्यात येतो. या पध्दतीने आज वानलेसवाडी हायस्कूलमधील मुलांना भात व आमटी दिली असता मुलांना पोट दुखी, मळमळ आणि उलटी होऊ लागल्याने शालेय प्रशासनाची तारांबळ उडाली. अचानकपणे ३० मुलांची तक्रार येताच त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.

हेही वाचा- मुंबई : लोकल प्रवासात ‘भारतीय संविधाना’चे स्मरण, मध्य रेल्वेचा नवा उपक्रम

जिल्हा रूग्णालयात ३० मुलांना उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर यापैकी सात मुलांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आल्याचे आणि उर्वरित २३ मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृर्ती ठीक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.

हेही वाचा- विश्लेषण: मलनिस्सारण प्रकल्पाची आवश्यकता का?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ शाळेला भेट देउन अन्नाचे नमुने घेण्याचे निर्देश दिले असून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणार्‍या महिला बचत गटाच्या प्रतिनिधीना तात्काळ बोलावून घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:58 IST