Coronavirus : राज्यात २४ तासांत पाच पोलिसांचा मृत्यू ; ३११ पोलीस करोनाबाधित

करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १९ हजार ३८५ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ३११ पोलीस करोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १९ हजार ३८५ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ६७० जण, करोनामुक्त झालेले १५ हजार ५२१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १९ हजार ३८५ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार १३१ अधिकारी व १७ हजार २५४ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार ६७० पोलिसांमध्ये ४७८ अधिकारी व ३ हजार १९२ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १५ हजार ५२१ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६३५ व १३ हजार ८८६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १९४ पोलिसांमध्ये १८ अधिकारी व १७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 311 police personnel of maharashtra police tested positive for covid19 5 died in the last 24 hours msr

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या