सांगली जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ४४७ गावापैकी ३८ गावच्या सरपंचांची बिनविरोधी निवड झाली असून ग्रामपंचायतीचे ५७० सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ४०९ गावच्या सरपंच आणि ४ हजार १४६ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून निम्मा जिल्हा निवडणुकीमध्ये दंग आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर ३८ गावचे सरपंच आणि ५७० सदस्य अविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. आता सरपंच पदाच्या ४०९ जागासाठी १ हजार १२० तर सदस्य पदाच्या ४ हजार १४६ जागासाठी ८ हजार ६०४ उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”!

जिल्हा मध्यवतीर्र् बँकेचे संचालक, भाजपचे युवा नेते राहूल महाडिक यांच्या येलूर गावच्या सरपंच पदासाठी अविरोध निवड झाली आहे. याशिवाय कोळे, चिखली, खुंदलापूर, येवलेवाडी, गार्डी, ढवळेश्‍वर, माधळमुठी, सवाळवाडी, वासुंंबे, वाकाईवाडी, गौरवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी, तांदूळवाडी, बनेवाडी आदी गावातील सरपंच निवडी अविरोध झाल्या आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरूड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुफिरे, चिखल, खुंदलापूर, वाकाईवाडी, शिंदेवाडी, तासगाव तालुक्यातील चिंचणी, कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी, कडेगाव तालुक्यातील विहापूर, येवलेवाडी, खानापूर तालुक्यातील गार्डी, ढवळेश्‍वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी, मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील रेवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील पुणदीवाडी, हजारवाडी आदी ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 38 village sarpanches were elected unopposedin out of 447 villages sangli district grampanchayt elecation dpj
First published on: 09-12-2022 at 18:22 IST