scorecardresearch

दहा महिन्यात तिप्पटच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक

सांगली : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास दहा महिन्यात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम मिळवून देण्याची खात्री देत चौघांना सुमारे १३ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार पलूस तालुययातील वसगडे येथे घडला. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात एका व्यापार्‍यांने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सांगितले, वसगडे येथील व्यापारी आशिषकुमार पाटील यांना  भिमगोंडा उर्फ सन्मती […]

crypto fraud case,
क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक … (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सांगली : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास दहा महिन्यात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम मिळवून देण्याची खात्री देत चौघांना सुमारे १३ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार पलूस तालुययातील वसगडे येथे घडला. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात एका व्यापार्‍यांने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सांगितले, वसगडे येथील व्यापारी आशिषकुमार पाटील यांना  भिमगोंडा उर्फ सन्मती पाटील रा.समडोळी यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली तर महिन्याला गुंतवणुकीच्या ३० टक्के या प्रमाणे दहा महिने रक्कम परत मिळेल असे खात्रीपूर्वक सांगितले. त्यांने हमी दिल्याने या योजनेत फिर्यादी पाटील यांनी आठ लाख रूपये गुंतवले, तसेच फिर्यादीचे  मित्र आयुब कागदी यांनी एक लाख रूपये, संदीप चिंचवड यांनी १ लाख ७० हजार रूपये  तसेच नातेवाईक शांतीनाथ पाटील यांनी ९०  हजार, अभिनंदन धरणगुळे यांनी दोन लाख असे पैसे गुंतविले. १० जून २०२२  ते  १५ फेब्रुवारी २०२३  या कालावधीत ही रक्कम गुंतविण्यात आली. मात्र, आजतागायत पैसे अथवा परतावा मिळाला नसल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:34 IST

संबंधित बातम्या