सांगली : महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ४० मुलांना मारहाण केल्या प्रकरणी एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून मुख्याध्यापकांची अन्य शाळेत बदली करण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी मंगळवारी आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सांगली महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ३९ मध्ये १७ ऑक्टोबर रोजी सहायक शिक्षिका विजया सुरेश शिंगाडे यांच्याकडून सुमारे ४० विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत पालक व विद्यार्थी यांनी तक्रार केलेली होती.

या प्रकरणी महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव, सहायक आयुक्त सचिन सागावकर व प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी चौकशी केली असता विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने आयुक्त गुप्ता यांनी नोंद घेऊन शाळेचे मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली तर शिक्षिका श्रीमती शिंगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली.