Premium

सांगली: एकाच दिवशी ४५० कर्मचारी निवृत्त

वय मोजण्यासाठी बरे म्हणून गुरूजींच्या सोयीने शाळा प्रवेशावेळी एक जूनची जन्मतारीख नोंदली गेलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४५० कर्मचारी शासकीय सेवेतून बुधवारी निवृत्त झाले.

employees retired
एकाच दिवशी ४५० कर्मचारी निवृत्त (फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस)

सांगली : वय मोजण्यासाठी बरे म्हणून गुरूजींच्या सोयीने शाळा प्रवेशावेळी एक जूनची जन्मतारीख नोंदली गेलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४५० कर्मचारी शासकीय सेवेतून बुधवारी निवृत्त झाले. नियतवयोमानानुसार निवृत्त झालेल्या या कर्मचार्‍यांना निरोप देण्यासाठी खास समारंभाचे आयोजनही विविध विभागात करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांना शाळेत प्रवेश देत असताना पालकांना निश्‍चित जन्मतारीख आठवत नसेल तर अथवा वय मोजण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी गुरूजींनी अनेक मुलांची जन्मतारीख एक जून ही निश्‍चित केली होती. १९९५ पर्यंत याच पध्दतीने जन्मतारखांची नोंद शाळेत करण्यात येत होती. त्यानंतर मात्र, शाळेत प्रवेश घेत असताना महापालिका, ग्रामपंचायत यांचा जन्मदाखला आवश्यक करण्यात आल्याने मुलाची खरी जन्मतारीख शाळा प्रवेशावेळी नोंदली जात आहे. मात्र, तत्पुर्वी शाळेत प्रवेश केलेल्यांची जन्मतारीख गुरूजींच्या सोयीनुसार नोंदली गेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 450 employees retired on a single day sangli amy

Live Express Adda With MoS Rajeev Chandrasekhar

संबंधित बातम्या