बुलढाण्यात तीन गाड्यांचा भीषण अपघात; पाच ठार, चार गंभीर जखमी

दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनची पोती घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या सुमोला धडक दिली.

Accident in Buldhana
तीन वाहनांचा अपघात झाला

मंगळवारी आज सकाळच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-खामगाव रोडवर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जण ठार झाले असून ४ जण जखमी झाले आहेत.

वैरागड फाट्यावर आज सकाळी हा विचित्र असा तिहेरी अपघात घडला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी तीन वाहनामध्ये विचित्र अपघात होऊन ५ जण जागीच ठार झाले. तर या भीषण अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनची पोती घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या सुमो गाडीला त्यांनी धडक दिली. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 5 dead in accident at buldhana scsg

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या