scorecardresearch

Premium

नांदेड : शेतीपूरक साहित्य दुकान आगीच्या विळख्यात , ५० लाखांचे नुकसान ; चार तासानंतर आगीवर नियंत्रण

स्वाती विवेक चिद्रावार यांचे विवेक एजन्सीज या नावाचे ठोक व किरकोळ शेतीपूरक साहित्य विक्रीचे नामांकित दुकान आहे.

Agricultural materials shop in fire
( प्रतिनिधिक छायाचित्र)

नवा मोंढा येथे शेतीपूरक साहित्य विक्रीच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागून या दुकानातील सुमारे ५० ते ६०लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका दुकानाला प्रथम आग लागली आणि या आगीचे लोट या दुकानात शिरल्यानंतर आगीचा भडका उडाला. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना सुमारे चार तास लागले.

स्वाती विवेक चिद्रावार यांचे विवेक एजन्सीज या नावाचे ठोक व किरकोळ शेतीपूरक साहित्य विक्रीचे नामांकित दुकान आहे. त्या दुकानामध्ये शेतीसाठी उपयुक्त असणारे ठिंबकचे बंडल, स्क्रीन कलर, तुषार पाईप, पीव्हीसी पाईप आणि इतर साहित्य होते. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य प्लास्टिक स्वरूपात होते. खरीप हंगाम संपल्यानंतर आता रब्बी हंगामाला सुरुवात होत असल्याने चिद्रावार यांनी शेतीसाठी लागणार्‍या साहित्यांचा मोठा साठा उपलब्ध करून ठेवला होता. या दुकानाची रुंदी ५० तर लांबी ७० फूट असून सात – आठ मीटर उंचीचे टीनशेडचे दुकान आहे.

devendra fadnavis
तैवानबरोबर तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
navi mumbai, union fisheries minister parshottam rupala, national fisheries conference, navi mumbai fisheries
नवी मुंबई : राष्ट्रीय मत्स्य संमेलनाला केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री उपस्थीत राहणार, मत्स्य व्यवसायातील अडचणींवर होणार चर्चा
raj thackeray wife sharmila thackeray, sharmila thackeray spit free road campaign, udayanraje bhosle spit free road campaign
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा
Shinde Fadnavi Newspaper Ad
“दोन कोटी रुपये खर्चून वृत्तपत्रात पानभर जाहिरातींसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण…”, रोहित पवारांचा टोला

या दुकानाच्या पाठीमागील भागात संगीता सुनील राखे यांचे मंगलम ट्रेडर्स या नावाने प्लास्टिक साहित्य (युज अ‍ॅण्ड थ्रो) विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री सर्वप्रथम या दुकानात आग लागली. प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीचा लगेच फडका उडाला आणि विवेक एजन्सीच्या पाठीमागून ही आग या दुकानात शिरली. दोन्ही दुकानामध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्याने आग विझविताना मोठे अडथळे येत होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर विवेक चिद्रावार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अग्नीशमन दलाची एक गाडी आग विझवत होती. परंतु आगीचे तांडव पाहता आणखी तीन गाड्या मागविण्यात आल्या. तसेच एमआयडीसीचे एक वाहन, पोर्टेबल पम्प आणि दोन टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 50 lakhs loss in agricultural supply shop fire amy

First published on: 02-10-2022 at 22:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×