अचानक मंडळाकडून ५१ हजार शेणीचे दान

होळी पौर्णिमेच्या सणाला विधायक वळण देत येथील अचानक तरुण मंडळातील महिलांनी शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीस ५१ हजार शेणी दान केल्या.

होळी पौर्णिमेच्या सणाला विधायक वळण देत येथील अचानक तरुण मंडळातील महिलांनी शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीस ५१ हजार शेणी दान केल्या. यावेळी महापौर सुनीता राऊत, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परीक्षित पन्हाळकर, संजय िशदे उपस्थितीत होते. अचानक तरुण मंडळ गेली ११ वष्रे होळी पोर्णिमेनिमित्त शेणी दान करतात. होळीमध्ये शेणी जाळल्याने त्याचा सामाजिक उपयोग काहीच होत नाही. मात्र स्मशानभूमीला शेणी दान केल्यामुळे मोफत होणाऱ्या अंत्यविधीस त्याचा उपयोग होत असतो. ही विधायक भूमिका घेऊन हे मंडळ शेणीदान उपक्रम सातत्याने राबवित आहे. नागरिकांनीही शेणी दान करून या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.रूपा नागावकर, राजर्षी िशदे, सुनीता पाटील, स्मिता सोनाळीकर, जयश्री धाडणकर, माणिक पाटील, सुजाता राठोड, रोहिणी सांगावकर, शोभा गिड्डे, अर्चना पाटील, शीतल देवळेकर, संदीप पोवार, किरण पोतदार, राहुल घाटोळ, सुरज पोतदार यासह मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 51 thousand dung cake alms achanak mandal kolhapur