अलिबाग- रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा ५४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीसाठी सात मतदारसंघातून एकूण ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ज्यात पनवेल मधील १३, कर्जत मधील ९, उरण मधील १४, पेण मधील ७, अलिबाग मधील १४, श्रीवर्धन मधील ११ तर महाड मधील ५ उमेदवारांचा समावेश होता. अपेक्षित मते न मिळाल्याने यातील ५४ उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाडमध्ये ३ ,पनवेल १०, श्रीवर्धन ९, उरण ११, कर्जत ६, पेण ४, अलिबाग ११ अशी अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह इतर नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> Aditi Tatkare : मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा, आता मंत्रिपदाकडे लक्ष; आदिती तटकरे म्हणाल्या…

जिल्ह्यात अपेक्षित मतांचा कोटा पुर्ण केल्याने, १९ उमेदवारांची अनामत रक्कम वाचली आहे. यात निवडून आलेले उमेदवार, पराभूत झालेल्या प्रादेशिक पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. राजेंद्र ठाकूर, ज्ञानदेव पवार, मनसेचे श्रीवर्धनचे उमेदवार फैसल पोपेरे यांचा याच समावेश आहे.

हेही वाचा >>> अलिबागचा पांढरा कांदा यंदा उशिरा; पाऊस लांबल्याने, लागवड रखडली.  

नियम काय सांगतो….

ज्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्या मतदारसंघात झालेल्या एकूण वैध मतांमधून नोटाला पडलेल्य मतांची वजाबाकी करून, उरलेल्या वैध मतांच्या १/६ मते पडणे आवश्यक असते, तेवढी मते न मिळाल्यास उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. उदा. जर विधानसभेच्या जागेसाठी २ लाख मतदान झाले असेल तर तर प्रत्येक उमेदवारांनी वैध मतांपैकी ३३ हजार ३३२ मंतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे.

कोणाची अनामत रक्कम वाचली…. विजयी झालेल्या आ.प्रशांत ठाकूर( पनवेल),महेंद्र थोरवे (कर्जत),रविंद्र पाटील( पेण),महेश बालदी (उरण),अलिबाग (महेंद्र दळवी),आदिती तटकरे( श्रीवर्धन),भरत गोगावले ( महाड ) यांची अनामत रक्कम वाचली आहे. त्याच बरोबर पक्षांचे प्रमुख पराभूत उमेदवार बाळाराम पाटील,लीना गरड ( पनवेल),सुधाकर घारे,नितीन सावंत (कर्जत),प्रीतम म्हात्रे,मनोहर भोईर ( उरण),प्रसाद भोईर,अतुल म्हात्रे (पेण),चित्रलेखा पाटील,दिलीप भोईर( अलिबाग),अनिल नवगणे( श्रीवर्धन),स्नेहल जगताप( महाड) याची अनामत रक्कम वाचली आहे. उर्वरीत सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.