लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत हजारो सदस्यांच्या उपस्थितीत पुसेगाव येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. श्रीसेवागिरी देवस्थान मंदिर ते जुना पोस्ट रोड (रथ मार्ग गावठाण), शिवाजी चौक ते शासकीय विद्यानिकेतन गेट, यात्रास्थळ पटांगण असा एकूण २० एकर परिसर, दुतर्फा रस्ता ७.३ किलोमीटर परिसरात महास्वच्छता अभियान होऊन १६९७ श्री सदस्यांनी दोन तासांत ५७ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा हद्दपार करून परिसर चकाचक केला.

first time in 15 years vasai virar municipal corporations hospitals and health centers were cleaned
१५ वर्षानंतर पालिका रुग्णालये झाली चकाचक, पालिकेने राबवली मेगा स्वच्छता मोहीम
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील स्वच्छतेच्या शिलेदारांनी पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या काठावर केली स्वच्छता
Administration Immediately Cleans Chandrabhaga River after loksatta report
लोकसत्तेच्या बातमीची दाखल, चंद्रभागा नदीची प्रशासनाने केली तातडीने साफसफाई
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
cleaning campaign of Nag Tsoli and Pohra rivers in city will start from February 7
नागपुरातील तीन नद्यांची सफाई एकाच वेळी , सात पोकलेन आणि बरेच काही …
Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…

श्री सेवागिरी यात्रेसाठी लाखो भाविक पुसेगाव येथे श्रीसेवागिरी महाराज रथोत्सव यात्रेसाठी येतात. बारा दिवस यात्रा कालावधी असतो. भव्य यात्राप्रदर्शन पाहावयास मिळते. होणारा कचरा यात्रा संपन्न झाल्यानंतर अस्ताव्यस्त पाहायला मिळतो. ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टमार्फत प्रतिष्ठानाला विनंती करण्यात आली. मनुष्यबळ महत्त्वाचे असल्याने अखंड समाजसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे राज्यपालनियुक्त स्वच्छतादूत महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पुसेगावमध्ये महास्वच्छता अभियान झाले.

आणखी वाचा-फलटणमध्ये अंधश्रद्धेतून महिलेचा खून

अभियानाच्या प्रारंभप्रसंगी श्रीसेवागिरी देवस्थान ट्रस्ट व सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधिर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, संतोष वाघ, गौरव जाधव, माजी विश्वस्त सुनील जाधव, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, डॉ. ओंकार हेंद्रे, डॉ. स्नेहा हेंद्रे, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य विजय गायकवाड, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

अभियानाचे शिस्तबद्ध नियोजन पाहून आम्ही भारावलो. यात्रा कालावधी झाल्यानंतर एवढा मोठा कचरा उचलणे आवाक्याबाहेर होते. मात्र, या स्वयंसेवकांनी निष्काम सेवेची पराकाष्ठा करून परिसर स्वच्छ केला. -डॉ. सुरेश जाधव, अध्यक्ष, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव

Story img Loader