शेतकऱ्यांना खत वाहतुकीकरिता येणाऱ्या खर्चात बचत करणे, शेतकऱ्याच्या वेळेची बचत करणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या बांधावर खत योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामात या योजनेतून ६ हजार २२० मेट्रिक टन खत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात येणार आहे.

दर वर्षी या योजनेतून खताच्या मागणीत वाढ होत आहे.

शेतकरी गटांतर्फे खताची मागणी करण्यात येते, त्यानुसार खत पुरवठा केला जातो. कारखान्यातून खत शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे खतामध्ये भेसळ नसते. चांगल्या प्रतीचे खत शेतकऱ्यांना मिळते. खताच्या काळाबाजार रोखला जातो. कमी पशात चांगले खत मिळते. यंदा ६ हजार २२० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. यात ४ हजार ६०० मेट्रिक टन युरिया तर १ हजार ६२० मिश्र खताचा समावेश आहे.

रायगड जिल्हय़ात भात लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. हे पाहता कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे. उत्पादकता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा १ लाख ७ हजार ९१८ हेक्टरवर भातशेती करून प्रतिहेक्टरी ३ हजार १०० किलो उत्पादकता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी प्रति हेक्टरी २ हजार ८८४ प्रति हेक्टरी उत्पादकता होती.

यंदा १७ हजार िक्वटल बियाणांची मागणी करण्यात येणार आहे. महाबीजचे संकरित ११ हजार ४५० िक्वटल व संकरित ५० िक्वटल. खासगी सुधारित ५ हजार ४०० िक्वटल तर सुधारित १०० िक्वटल बियाणांची मागणी करण्यात येणार आहे.