एजाजहुसेन मुजावर, तानाजी काळे

सोलापूर, इंदापूर : महाराष्ट्रातील प्रमुख मोठय़ा धरणांपैकी समजले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाने अवघ्या चार महिन्यांत तळ गाठला आहे. येत्या आठवडाभरात या धरणातील सुमारे ६० टीएमसी एवढा प्रचंड उपयुक्त पाणीसाठा संपण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. साखर कारखानदारांशी हितसंबंधित राजकीय मुजोरपणा आणि कणाहीन प्रशासनामुळे या धरणाच्या पाणी वाटपाचे नियोजन ढिसाळपणा समोर आला आहे.
मागील जानेवारीपर्यंत शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात आजअखेर जेमतेम ८ टक्के म्हणजेच केवळ ४ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ३७.१६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. उजनी धरण अधूनमधून शंकर टक्के भरते. तर कधी पुरेशा पावसाअभावी धरण ५० टक्यांच्या पुढे मजल गाठत नाही. तेव्हा पुणे जिल्ह्यातील खडकवासला किंवा अन्य धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु जेव्हा या धरणात मुबलक पाणीसाठा असतो तेव्हा पाणीवाटपाचे नियोजन योग्य प्रकारे होत नाही. ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे धरणातील पाणी पळवून नेले जाते. यात शेजारच्या बारामतीसह माढा आदी भागातून राजकीय कुरघोडय़ांमुळे अत्यल्प काळात धरणातील पाणी फस्त होते.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
two thief from kalyan ambernath arrested in housbreaking case
महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणारे कल्याण, अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरटे अटकेत
koradi police station, Nagpur, case registered, Sexual abuse, minor girl
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

गेल्या वर्षी १० आ?क्टोबर रोजी उजनी धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजे एकूण १२३ टीएमसी पाणीसाठा होता. त्यात उपयुक्त पाणीसाठा ५९.५० टीएमसी होता. तत्पूर्वी, प्रचंड पावसामुळे पूरनियंत्रणाचा भाग म्हणून मोठय़ा प्रमाणावर पाणी भीमा नदीवाटे सोडण्यात आले होते.धरणातील पाणीवाटपाचे दरवर्षी मंत्रालयातील बैठकीत नियोजन आखले जाते. साधारणपणे जानेवारी महिन्यापासून पाण्याचे आवर्तन सोडले जाते. परंतु यंदाच्या हंगामात एक महिना अगोदर म्हणजे डिसेंबरपासूनच धरणतून पाणी सोडण्यात आले. एरव्ही, तीन आवर्तने सोडली जातात. परंतु यंदा एक आवर्तन जास्तच झाल्याचे दिसून आले. याशिवाय सोलापूर शहरासह इतर लहान मोठी शहरे, उद्योग प्रकल्प आणि प्रामुख्याने शेती सिंचनासाठी वारेमाप पाणी सोडण्यात येते. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ४० वर असून पैकी ३८ कारखान्यांचे गळीत हंगाम यंदा सुरू होते. ऊस लागवड क्षेत्र आता दोन लाख ४० हजार हेक्टपर्यंत वाढले आहे. ही सर्व शेती उजनीच्या पाण्यावर पोसली जात आहे. वाढते ऊस क्षेत्र हे एक उजनीतील पाणी फस्त करण्याचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह आसपासच्या भागातही साखर कारखानदारी वाढली आहे. यात माढा, बारामतीमधील कारखानदारी ही मातब्बर राजकीय नेत्यांशी संबंधित आहे. त्यांचे हितसंबंध उजनी धरणाच्या पाण्याभोवती गुंतलेले असून प्रशासनही कायदा, नियम पाळण्याऐवजी राजकीय मुजोरीमुळे कणाहीन बनले आहे. गळती आणि बाष्पीभवनाच्या नावाखालीही पाणी गायब होते.यासंदर्भात उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक धीरज साळे यांच्याशी सातत्याने संपर्क साधूनही उजनी धरणातील झटपट फस्त होणाऱ्या पाण्याविषयी स्पष्टीकरण देण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली.

पाणीसाठा का संपला?

सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आणि ऊस उत्पादन होते. या ऊस शेतीचे कार्यक्षेत्र दोन लाख ४० हजार हेक्टपर्यंत वाढले आहे. या उसासाठी पाण्याचा बेसुमार वापर होत आहे. हा बहुतांश पाण्याचा वापर उजनीच्या आवर्तनातून होत असतो. हे पाणीवाटप नियोजनशून्य झाले आहे. यंदा पाणी वाटपाच्या तीन आवर्तनांपेक्षा एक आवर्तन जास्त सोडले गेले. अजूनही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनीतील तब्बल ६० टीएमसी पाणी अवघ्या चार महिन्यात फस्त झाले आहे.

परिणाम काय?

उजनी धरणात असलेला मुबलक पाणीसाठा अत्यल्प काळात संपुष्टात येत असल्यामुळे येत्या मे महिन्यातच धरणातील पाणीसाठा उणे पातळीवर जाणार आहे. योग्य नियोजन झाले असते तर जूनपर्यंत उपयुक्त पाणीसाठा पुरला असता. याचा पहिला परिणाम हा सोलापूर शहर आणि नदीकाठच्या अन्य पाणी पुरवठा योजनांवर होणार आहे. सोलापूर शहरासाठी सध्या केवळ २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नंतर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता दुरापास्त ठरणार आहे. परिणामी, सोलापूरकरांचे पाण्यासाठी आणखी हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे.