जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी ६९.९२ असून, सर्वाधिक ७३.६३ टक्के मतदान जिंतूर मतदारसंघात झाले. निवडणुकीचे निकाल दिवाळीआधीच लागणार असल्याने आता कोणाची दिवाळी व कोणाचे दिवाळे वाजणार, हेही स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात १३ लाख ८ हजार १६९पकी ९ लाख १४ हजार ४९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुका चुरशीच्या झाल्याने ही टक्केवारी आपोआप वाढली. गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गावोगावी प्रमुख उमेदवारांची ‘रसद’ही पोहोचली होती. या आधीच्या निवडणुकांत धनशक्तीचा एवढा मोठा प्रभाव जाणवत नव्हता. या वेळी तो प्रकर्षांने जाणवला. केवळ यंत्रणेवर खर्च करणाऱ्या उमेदवारांनीही बहुतेक मतदारांना थेट ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले. मतदानानंतर गावोगावचे कार्यकत्रे यावर प्रकाश टाकत होते.
जिंतूर मतदारसंघातील मतदान जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रामप्रसाद बोर्डीकर, विजय भांबळे यांच्यातील  प्रतिष्ठेच्या लढतीमुळे मतदानाचा टक्का वाढला. येथे तब्बल २ लाख ३८ हजार ५८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गंगाखेडमध्ये ६९.५६ टक्के मतदान झाले. येथे १ लाख ४८ हजार ७४५ मतदारांनी मतदान केले. पाथरीत २ लाख ३३ हजार ४२० मतदारांनी (६९.९९ टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
या तिन्ही मतदारसंघांच्या तुलनेत परभणी मतदारसंघात ६६.०३ टक्केच मतदान झाले. २ लाख ८५ हजार ८६१पकी १ लाख ८८ हजार ७४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात पुरुष मतदानाची टक्केवारी अधिक असून, एकूण पुरुष मतदानाच्या ती ७१.८० टक्के आहे. महिला मतदानाची टक्केवारी एकूण महिला मतदारांच्या ६७.८५ टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढती झाल्याने काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक निकालास दोन दिवस शिल्लक असले, तरी सर्वत्र कोण निवडून येणार याबाबत चच्रेचे फड रंगू लागले आहेत. उमेदवारांचे कार्यकत्रे आकडेमोड करण्यात व्यग्र आहेत. आपल्या गावात आपल्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा हे कार्यकत्रे करीत आहेत. प्रत्यक्ष निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. कोणाचे भवितव्य उजेडात, तर कोणाचे राजकीय अंधारात ते ठरणार आहे. चारही मतदारसंघांत ८१ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले. निकालानंतर अनेकांना आश्चर्याचे धक्के बसतील. आपण उधळलेला पसा व झालेले मतदान याची आकडेवारी पाहू जाता काही उमेदवारांचे डोळे पांढरे होऊ शकतात!
लातूर जिल्हय़ात ६६ टक्के मतदान
वार्ताहर, लातूर
जिल्हय़ात ६ मतदारसंघांत १७ लाख २४ हजार ३३७ पकी ११ लाख ४५ हजार ६५१ मतदारांनी मतदान हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६६.४४ आहे.
६ लाख १५ हजार ५३ पुरुष मतदार, ५ लाख ३० हजार ५९८ महिला मतदारांनी मतदान केले. लातूर ग्रामीण मतदारसंघात २ लाख ९३ हजार ५६१पकी २ लाख ४ हजार ९८५, यात पुरुष मतदार ७१.२३, तर ६८.२२ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात ६९.८३ टक्के मतदान झाले. मागील वेळी या मतदारसंघात ७०.६४ टक्के मतदान झाले होते.
लातूर शहर मतदारसंघात ३ लाख २८ हजार २६५पकी २ लाख २ हजार २२ मतदारांनी मतदान हक्क बजावला. यात पुरुष मतदारांचे प्रमाण ६१.६३, तर महिला मतदारांचे प्रमाण ६१.४५ टक्के आहे. एकूण ६१.५४ टक्के मतदान झाले. मागील वेळी या मतदारसंघात ५९.६९ टक्के मतदान झाले.
अहमदपूर मतदारसंघात २ लाख ८९ हजार ४६६पकी २ लाख २ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदारांचे प्रमाण ७०.४६, तर महिला मतदारांचे प्रमाण ६९.५३ टक्के आहे. एकूण ७०.०३ टक्के मतदान झाले. मागील वेळी येथे ६२.७६ टक्के मतदान झाले.
उदगीर राखीव मतदारसंघात २ लाख ७० हजार ८८०पकी १ लाख ६८ हजार ८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६२.६९ टक्के पुरुष, तर ६१.९२ टक्के महिला मतदार आहेत. ६२.३४ टक्के मतदान झाले. मागील वेळी ६३.७६ टक्के मतदान झाले होते.
निलंगा मतदारसंघात २ लाख ८५ हजार ३५पकी १ लाख ९२ हजार ८०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदार ६७.३७ टक्के, तर महिला मतदारांचे प्रमाण ६७.९६ टक्के होते. एकूण ६७.६४ टक्के मतदान झाले. मागील वेळी येथे ६८.३९ टक्के मतदान झाले.
औसा मतदारसंघात २ लाख ५७ हजार १३०पकी १ लाख ७४ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदार ६७.९४ टक्के, तर महिला मतदार ६७.५९ टक्के, तर एकूण ६७.७८ टक्के मतदान झाले. मागील वेळी येथे ६५.७३ टक्के मतदान झाले.