मुंबई :  करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असतानाच, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये गेल्या सव्वा वर्षांत लागलेल्या आगी किं वा प्राणवायूच्या गळतीमुळे राज्यात ७६ रुग्णांना नाहक जीव गमवावा लागला आहे.

भंडारा आणि नगर या दोन शासकीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागांमध्ये आगी लागल्या. भंडाऱ्यातील आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुंबईतील भांडुप, विरार, नागपूर, मुंब्रा येथील खासगी रुग्णालयांमध्ये आगीत अतिदक्षता विभागातील रुग्ण दगावले होते. नाशिकमध्ये महानगरपालिके च्या रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीत गळती होऊन करोनाबाधित रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा झाला नाही व त्यात २२ जण दगावले होते. आगींमध्ये ५४ तर प्राणवायूच्या टाकीतील गळतीमुळे प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने २२ जण मृत्युमुखी पडले.

करोनाकाळात रुग्णालयांमधील दुर्घटना

भंडारा शासकीय रुग्णालय – १० बालकांचा होरपळून मृत्यू

विरार  – १५ जणांचा मृत्यू

मुंबईतील भांडुपमधील ड्रीम मॉल इमारतीतील करोना कें द्र – ११ जणांचा मृत्यू

 मुंब्रा खासगी रुग्णालय – ४ जणांचा मृ्त्यू

नागपूरमध्ये खासगी रुग्णालय- ४ जणांचा मृत्यू

नगरचे शासकीय रुग्णालय  – ११ जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये प्राणवायू टाकीत गळती व त्यातून प्राणवायूचा पुरवठा खंडित झाल्याने २२ जणांचा मृत्यू