scorecardresearch

आई रागावल्याने ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या..

शेजल दोरास्वामी मुदालियार वय-१४ असं आत्महत्या केलेल्या मुलीच नाव आहे.

आई रागावल्याने ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या..
प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड मधील काळेवाडी येथील घटना.

आई रागावल्याने एका १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.ही घटना शुक्रवारी सांयकाळी समोर आली.शेजल दोरास्वामी मुदालियार वय-१४ असं आत्महत्या केलेल्या मुलीच नाव आहे.ती इयत्ता ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती. बाहेरगावी जायचं असल्याने आईने मयत शेजल ला घरातील साफ सफाई करायला सांगितली होती परंतु ती न केल्याने आई रागावली होती,यातूनच आत्महत्या झाली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेजल दोरास्वामी मुदालियार वय-१४ रा.राधा कृष्ण मंदिरा जवळ,नढे नगर काळेवाडी.अस मयत मुलीचे नाव आहे.गुरुवारी शेजलाल तिच्या आईने घरातील साफ सफाई करायला सांगितली होती.मात्र ती न केल्याने शेजलाल आई रागावली होती.याच कारणावरून शेजलने शुक्रवारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना सांयकाळी पाऊने सहाच्या सुमारास समोर आली.शुक्रवारी आई आणि वडील कामावर गेले होते,दोघेही शेजलला फोन करत होते शेजल फोन उचलत नव्हती.हा प्रकार बराच वेळ चालला त्यामुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून याची माहिती दिली,शेजारी राहणारा व्यक्ती शेजलाल सांगण्यासाठी घरी गेला पण दरवाजा बंद होता.त्यावेळी त्या व्यक्तीने खिडकी मधून डोकावून पाहिले असता शेजलने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती तातडीने आई आणि वडिलांना देण्यात आले.आई आणि वडील आल्यानंतर शेजलला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत तिची प्राण ज्योत मालवली होती.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-04-2018 at 08:35 IST

संबंधित बातम्या