डेंग्यूने मुंबईत थमान घातले असल्याने सर्वत्र एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग तालुक्यात डेंग्यू संशयित रुग्ण आढळले असून येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण ८ संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने डेंग्यूच्या अंतिम तपासणीसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.     बेलकडे गावातील संदीप नारायण पाटील आणि आक्षी गावातील दीपिका पाटील यांच्यासह इतर सहा रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्ण डेंग्यू संशयित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात आलेल्या ८ रुग्णांच्या रक्ताचे नमुने ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. येथे घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यामध्ये हे सर्व डेंग्यू संशयित असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये अनिता पवार (निजामपूर, माणगाव), रसिका िशदे (कामत आळी, अलिबाग), जागृती सारंग (आक्षी, अलिबाग), जितेंद्र बाकडे (मुरुड), परेश िशदे (कामत आळी, अलिबाग), प्रिया गुंजाळे (वायशेत, अलिबाग), प्रीती मोरे (निजामपूर), संदीप पाटील (बेलकडे), दीपिका पाटील (आक्षी) यांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. यामध्ये १४ महिन्यांच्या अíपता उबाळे हिचाही समावेश आहे.
    जिल्हा आरोग्य व मलेरिया विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांत ३८१ रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले, त्यापकी ३५ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये मे महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.