रायगड जिल्ह्य़ात ८ हजार १७१ दहीहंडय़ा

रायगड जिल्ह्य़ामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून गोिवदा पथकांनी उंच मनोरे रचण्याचा सराव केला.

बुधवारी २४ ऑगस्टला श्रीकृष्ण जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्टला गोपाळकाळा सण साजरा करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्य़ात एकूण ८ हजार ३२१ दहिहंडय़ा उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये २ हजार ३७० सार्वजनिक, तर ५ हजार ८०१ खासगी दहिहंडय़ांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक दहिहंडय़ा दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे ९०० एवढय़ा असणार आहेत.

रायगड जिल्ह्य़ामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून गोिवदा पथकांनी उंच मनोरे रचण्याचा सराव केला. मात्र अचानक वीस फुटांपेक्षा अधिक दहीहंडी उभारण्यास बंदी आल्याने गोिवदा पथकातील मनोऱ्यांचे थर कमी झाल्याने गोिवदा पथकाच्या आनंदात विरजण पडले आहे. मात्र तरीही गोिवदा पथकही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. महिलांनी देखील यामध्ये सहभाग घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांच्या ठिकाणी लाखो रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक मंडळ, खासगी मंडळांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्य़ात एकूण ८ हजार १७१ ठिकाणी दहीहंडय़ा उभारण्यात येणार असून ५४ ठिकाणी मिरवणुका असणार आहेत. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक १५, खासगी ९०, नेरळ सार्वजनिक ६५, खासगी १५५, माथेरान सार्वजनिक ७, खालापूर सार्वजनिक ११, खासगी १९०, खोपोली सार्वजनिक ६०, खाजगी ५५, रसायनी सार्वजनिक १०५, खासगी १४०, पेण सार्वजनिक १११, खासगी २७०, दादर सागरी सार्वजनिक ४५, खासगी ११५, पोयनाड सार्वजनिक ९४, खासगी ४६, वडखळ सार्वजनिक १३५, खासगी १५०, अलिबाग सार्वजनिक १०५, खासगी ३६०, रेवदंडा सार्वजनिक १३०, खासगी २५६, मुरुड सार्वजनिक १४२, खासगी १९१, मांडवा सागरी सार्वजनिक ७५, खासगी १७०, रोहा सार्वजनिक १६८, खासगी ७३, कोलाड सार्वजनिक ६९, खासगी ५८, नागोठणे सार्वजनिक ५२, खासगी २३५, पाली सार्वजनिक ११७, खासगी ४८, माणगाव सार्वजनिक १७, खासगी ३१२, गोरेगाव सार्वजनिक २६, खासगी ९२, तळा सार्वजनिक २६०, खासगी २२, श्रीवर्धन सार्वजनिक ६८, खासगी ८७३, म्हसळा सार्वजनिक ८९, खासगी ५३५, दिघी सार्वजनिक ३५, खासगी ९००, महाड शहर सार्वजनिक ६५, खासगी ११४, महाड तालुका सार्वजनिक १०५, खासगी ११३, महाड एमआयडीसी सार्वजनिक ८६, खासगी ७०, पोलादपूर सार्वजनिक ११३, खासगी १३८ दहीहंडय़ांचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्य़ात योग्य तो पोलीस बंदोबस्त तनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 8 thousand 171 dahi handi in raigad district