महाराष्ट्रात करोनाचे नवे ८४१ रुग्ण, ३४ मृत्यू, संख्या १५ हजार ५०० च्या वर

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात करोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज दिवसभरात ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २८१९ झाली आहे.आज राज्यात ३४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी मुंबईत २६, पुण्यात ६, औरंगाबादमध्ये १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज झालेल्या ३४ मृत्यूंमध्ये २४ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. आज झालेल्या ३४ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले १४ रुग्ण आहेत. तर ४० वर्षे ते ५९ वर्षे या वयोगटातले १६ रुग्ण आहेत. तर ४ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने राज्यात एकूण ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 841 new covid19 positive cases 34 deaths reported in maharashtra today taking the total number of cases to 15525 scj

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या