लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे ९ रुग्ण आढळून आले असून, या आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Death due to GBS disease reported in a private hospital in Pune print news
‘जीबीएस’ बळींची संख्या सहावर! पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यूची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १७३ वर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
GBS patients pune, GBS , Health Department ,
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच; आरोग्य विभागाचा सर्वेक्षणावर भर
GBS cases are increasing in the state including in Solapur
जीबीएस’ला प्रतिबंध करण्यासाठी सोलापुरात घरोघरी सर्वेक्षण, नव्या चार संशयित रुग्णांवर उपचार
patients , GBS , maharashtra, ventilator,
राज्यात एकाच दिवसात जीबीएसचे ९ रुग्ण! एकूण रुग्णसंख्या ११० वर; व्हेंटिलेटरवर १३ जण
Continuous increase in GBS patients in Maharashtra
‘जीबीएस’ बळीनंतर केंद्र सरकार सावध; सोलापुरात रुग्णाचा मृत्यू; सात तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…

गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात ’जीबीएस’ आजाराचा जिल्ह्यातील आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आरोग्य विभागाकडून घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की या आजाराबाबत सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सांगली जिल्ह्यात जीबीएसचे आतापर्यंत ९ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ व शहरी भागातील ३ रुग्ण असून, जिल्ह्याबाहेरील २ व राज्याबाहेरील १ रुग्ण आहे. त्यांपैकी ४ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गत तीन वर्षांत या आजाराचे निदान झालेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोग प्रतिकारक्षमता वाढविणे, तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

Story img Loader