सातारा येथील एका व्यवसायिकाची महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात मध्यरात्री अज्ञातांनी गोळी झाडून एका व्यवसायिकाची हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. अमित बाबासाहेब भोसले असे गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.

हेही वाचा- ” मी पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे ….” देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Death of a person Bhadravati Taluka
चंद्रपूर : पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला
aap kandil morcha in kolhapur
कोल्हापुरातील २ हजार दिवे बंद; आपचा महापालिकेवर कंदील मोर्चा
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य

सातारा शहरात सातारा- पुणे महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. पुणे मार्गावर अनेक छोटीमोठी हॉटेल आहेत. येथे मध्यरात्रीपर्यंत हॉटेल खुली असतात. या परिसरात जेवण करण्यासाठी आलेल्या व्यवसायिक भोसले यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाला. यात भोसले यांचा मृत्यू झाला असून गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा- सातारा औद्योगिक वसाहत परिसरात कचरा डेपोला आग, नागरिकांकडून धुरामुळे संताप व्यक्त

गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्या झालेला युवक शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याची माहिती समोर येत आहे. युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत. या गोळीबारात अमित देशमुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच सातारा जिल्हा रुग्णालयात त्याच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे सातारा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- VIDEO: सातारा शहरात मध्यवस्तीत कोयता नाचवून दहशत माजविणारे पाच जण पोलिसांच्या ताब्यात

काल सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरात मध्यवस्तीत कोयता नाचवून दहशत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असतानाच, मध्यरात्री गोळीबार करून खून केल्याने साताऱ्यात गुन्हेगारी फोफावत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.