शेत जमिनीचा मोजणी नकाशा दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या भूमापकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल संपत अंभुरे (वय ३३) असे लाच मागणार्‍या भूमापकाचे नाव आहे. विशेष म्हणजे अनेकवेळा राहुल अंभुरे याच्याभोवती सापळा रचण्यात आला होता व त्याचा त्याला संशय येत असल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती.

हेही वाचा- लग्नानंतरच्या काही दिवसांत नवरीचा पोबारा; इस्लामपूरच्या नवरदेवाची लाखोंची फसवणूक

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

राहुल अंभुरेने ५० हजारांची रक्कम तक्रारदाराकडे मागितली होती. ४५ हजार रुपयांवर तडजोड झाली होती. पैकी ३५ हजार स्वीकारले होते. उर्वरीत दहा हजार रुपये घेऊन गेले असता वरिष्ठांची सही झाली नसल्याचे कारण देत राहुल अंभुरेने १० हजार रुपयांची लाच स्वीकारली नव्हती. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला राहुल अंभुरेने तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे लक्षात आल्यानंतर तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांच्या पथकाने कारवाई केली.