scorecardresearch

गुणरत्न सदावर्तेंवर मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला पाठोपाठ आता सोलापुरातही गुन्हा दाखल

छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी दिली फिर्याद

(संग्रहीत छायाचित्र)

वकील गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात कलम १५३अ,ब, ५००,५०६,५०६,५०७ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

तर सध्या कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाला असून, कोल्हापूर पोलीस आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याप्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आलेली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A case has been registered against gunaratna sadavarten in solapur msr

ताज्या बातम्या