दोन लाख रूपये आणि दीड तोळे सोने घेऊनही लग्नानंतर नवरीला न नांदवता धार्मिक विधीचे कारण सांगून पुण्यातील तीन महिलांनी पोबारा केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे घडली आहे.. या फसवणूक प्रकरणी नवरी मुलगी अर्चना शिंदे हिच्यासह मध्यस्थ रास्कर व ज्योती लोंढे व सोनाली काळे या दोन महिलाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- प्रेतयात्रा काढल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वारकऱ्यांनी राजकारणात…”

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

इस्लामपूर येथील रविंद्र जाधव (वय ३०) हा तरूण लग्नासाठी इच्छुक होता. या स्थितीचा फायदा घेत सचिन रास्कर यांने लग्न जुळवून देतो असे सांगून पुण्यातील तीन महिलांची ओळख करून दिली. लग्न जुळविण्यासाठी दोन लाख रूपये रोख घेण्यात आले. वाघोली पुणे येथील अर्चना भरत शिंदे हिच्याशी लग्नही लावून देण्यात आले. मात्र, लग्नानंतर मुलगी नवर्‍या घरी न नांदवता धार्मिक विधी करण्याचे कारण पुढे करून मुलीला परत नेण्यात आले. आजतागायत मुलगी परत नांदण्यास आलेली नाही. यामुळे फसवणूक केल्याची तक्रार इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा- दिल्लीत दिवसाढवळ्या १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला, बहिणीसोबत जात असताना दुचाकी शेजारी थांबली अन्…

पुण्यातही फसवणुकीचा प्रकार उघडकीस

श्रेया उर्फ मिताली चंदेल प्रकाश सिंग या पुण्यातील तरूणींने ५ लाख ८३ हजाराची फसवणूक केली असल्याची तक्रार विजय फसाले यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. संशयित तरूणीने प्रॉफिट मार्ट फायनान्शीयल सर्व्हिस या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकद्बारे ५ लाख ८३ हजार ५०० रूपये उकळले असल्याची तक्रार देण्यात आली आहे.