जालना – उत्तराखंडमधील केदारनाथ येथे पावसामुळे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला असून त्यात जालन्यातील एका तरुणाचा समावेश आहे. सुनील महादेव काळे (वय २४), असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो अंबड तालुक्यातील गोंदी येथील रहिवासी होता, अशी माहिती जालना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवले की, रविवारी सकाळी केदारनाथ येथे पावसामुळे दरड कोसळून तीन भावीक ठार तर आठ जखमी झाले आहेत. मृत सुनील काळे यांच्यासोबत पाथरवाला, शहागड, गोंदी येथील परमेश्वर चव्हाण त्यांचे सह ९ व्यक्ती आहेत. जालना जिल्हा प्रशासन सहमंत्रालय नियंत्रण कक्ष आणि रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संपर्कात आहे.