खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह | A dead body was found in a luxury bus amy 95 | Loksatta

X

खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.

खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
धावत्या लक्झरी बस मध्ये आढळला रक्त बंबाळ अवस्थेमध्ये मृतदेह

कासा: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.या प्रवाशाला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता पोलिसांनी त्याला मृत दाखल केले.घाटकोपर येथून निघालेली ही बस उदयपूर येथे जात असताना चारोटी जवळ ही घटना उघडकीस आली.स्लिपर कोच असणाऱ्या या बस मध्ये घोडबंदर येथे हा प्रवासी चढला.

डहाणू तालुक्यातील चारोटी नाकाच्या पुढे लघवी करण्यासाठी अन्याय प्रवासी बस मधून खाली उतरला असता त्याच्या बुटाला रक्त लागल्याने शोध घेतल्याच्या प्रक्रियेत एक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसले. बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बस वळवली. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आला आहे. कासा पोलीसांकडून या प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याच्या खिशात काही ब्लेड सापडल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 21:49 IST
Next Story
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली