नंदुरबारमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना, वेगाने धावणाऱ्या घोड्याची तरुणांना जोरदार धडक, बेशुद्द अवस्थेत रस्त्यावरच पडले | A horse hits youth during race in Nadurbar Video Viral sgy 87 | Loksatta

VIDEO: घोड्यांची शर्यत सुरु असताना तरुण रस्त्यावरच घालत होते वाद, तितक्यात वायूवेगाने आलेल्या घोड्याने…; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

घोडे शर्यतीदरम्यान रस्त्यावरच उभं राहून वाद घालणं तरुणांच्या अंगलट, घोड्याने दिली धडक

VIDEO: घोड्यांची शर्यत सुरु असताना तरुण रस्त्यावरच घालत होते वाद, तितक्यात वायूवेगाने आलेल्या घोड्याने…; काळजाचा ठोका चुकवणारी घटना
घोडे शर्यतीदरम्यान रस्त्यावरच उभं राहून वाद घालणं तरुणांच्या अंगलट, घोड्याने दिली धडक

तेराव्या शतकापासुन सुरु असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानच्या दसरा मेळाव्यात घोडेशर्यत ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या याच दसरा मेळाव्यातील घोडेशर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी एक दुर्घटना घडली आहे. शर्यतीदरम्यान रस्त्यावर आलेल्या काही तरुणांना वेगात धावणाऱ्या घोड्याने धडक दिली. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव विधीवत पुजेसह संपन्न झाला. या ठिकाणी होणारी घोड्यांची शर्यत आणि रावणपूजन खऱ्या अर्थाने आकर्षणाचा विषय असतो. करोनाच्या दोन वर्ष कालखंडानंतर यंदा घोडे शर्यतीत विशेष उत्साह दिसून आला.

हेही वाचा – CCTV: रात्रीची वेळ, रुग्णवाहिका अन् वेगाने आलेली कार; वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, मोदींनीही व्यक्त केला शोक

घोडे शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र घोडेशर्यती दरम्यान घोड्यांच्या रेस ट्रॅकवर काही तरुण वाद घालत उभे होते. याचवेळी शर्यतीतील घोडे याठिकाणी दाखल झाले. यातील एका घोड्याने तरुणांना जोरदार धडक झाली. काळजाचा ठरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक तरुण किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रीप्ट BJP, RSS ने लिहून दिली”; “भाजपाला मुंडे, शिंदे, ठाकरेंच्या मेळाव्यात स्थान नाही”

संबंधित बातम्या

भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर आला हत्तींचा कळप, रात्रीच्या वेळी लोको पायलटने कमालच केली, पाहा Viral Video
“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”
भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”
‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…
यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, १३ प्रवासी गंभीर जखमी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हुशार कुत्रा! जेवण मिळवण्यासाठी मित्राला कसा चकमा दिला एकदा पाहाच
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीराने दिली गुडन्यूज, बाळाचा व्हिडीओ केला शेअर
पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड
पुणे: मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मटार, फ्लाॅवर, कोबी, वांगी, मिरची स्वस्त
मुंबई: चंदनवाडी स्मशानभूमीतही लवकरच गॅस दाहिनी